आपुलिया हिता जो असे जागता | धन्य माता पिता तयाचिया ||१||
कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक | तयाचा हरिख वाटे देवा ||धृ ||
गीता भागवत करिती श्रवण | आणीक चिंतन विठोबाचे ||२||
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा | तरी माझ्या दैवा पार नाही ||
रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥ बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥ सर्व सुखाचे...
रामकृष्ण हरी
ReplyDelete