चाले हे शरीर कोणाचिये सत्तें । कोण बोलवितें हरीवीण ।।१।।
देखवी ऐकवी एक नारायण । तयाचें भजन चुकों नको ।।२।।माणसाची देव चालवी अहंता । मीचि एक करता म्हणों नये ।।३।।
वृक्षाचेही पान झालें त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ।।४।।
तुका म्हणे विठो भरला सबाह्य । तया उणें काय चराचरीं ।।५।।
No comments:
Post a Comment