वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ।।१।।
तेणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुणदोष अंगा येत ।।२।।
आकाश मंडप पृथिवी आसन । रामे तेथे मन क्रीडा करी ।।३।।
कथा कमंडलू देह उपचार । जाणवितो वारा अवसरु ।।४।।
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनी प्रकार सेवू रुची ।।५।।
No comments:
Post a Comment