Thursday, 30 March 2023

रूप पाहाता लोचनी अभंग

 रूप पाहतां लोचनीं ।

सुख जालें वो साजणी ॥

तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥

बहुतां सुकृतांची जोडी ।
म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥

सर्व सुखाचें आगर ।
बाप रखुमादेवीवरू ॥

धरिला पंढरीचा चोर लिरिक्स

 धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर 

गड़ा बांधुनिया दोर गड़ा बांधुनिया दोर 

धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर 


ह्रदय बंदी खाना केला 

आत विट्ठल कोंडिला 

शब्दी केलि जड़ा जोड़ी 

विट्ठल पायी घातली वेडी 

धरिला पंढरीचा चोर..


सोहम शब्दांचा मारा केला 

विट्ठल कौकोड़ी ला आला 

जनि मने का विट्ठला 

जिवे न सोडी मी रे तूला 

धरिला पंढरीचा चोर

अबीर गुलाल उधळीत रंग लिरिक्स

 अबीर गुलाल उधळीत रंग अभंग मराठी लिरिक्स

अबीर गुलाल उधळीत रंग,

नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ ||


उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीन ,

रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन,

पायरीसी होवू दंग गावूनी अभंग || १ ||

नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग


वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू,

चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू ,

विठ्ठलाचे नाव घेवूनि निसं:ग || २ ||

नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग


आषाढी कार्तिकी भक्तजन येती ,

पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती,

चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग || ३ ||

नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग


अबीर गुलाल उधळीत रंग,

नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग

चाले हे शरीर कोणाचिये सत्ते

 चाले हे शरीर कोणाचिये सत्तें । कोण बोलवितें हरीवीण ।।१।।

देखवी ऐकवी एक नारायण । तयाचें भजन चुकों नको ।।२।।

माणसाची देव चालवी अहंता । मीचि एक करता म्हणों नये ।।३।।

वृक्षाचेही पान झालें त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ।।४।।

तुका म्हणे विठो भरला सबाह्य । तया उणें काय चराचरीं ।।५।।

अग राधे तू हळू हळू चाल ना..

 अग राधे तू हळू हळू चाल ना,

त्या मथुरेच्या बाजारी भेट ना,

तुझ्या केसात हाय गजरा

तू करू नका लई नखरा!!

तिथे भेटेल यशोदे चा हरी,

करील तुझ्याशी कुरघोडी,

तुझ्या नाकात हाय नथनी,

 तुझी करील तो खोडी!!

हा नंदाचा खट्याळ कान्हा,

करतो गोकुळात धिंगाणा,

तुझी ओढील ग वेणी,

 भरल्या बाजारी!!

तुझी रंगाने भिजवील साडी,

राधे करू नको मस्करी,

गाते गौळणी ला,

ऐक तू माझे जरा!!

आणिक दुसरें मज नाहीं आतां

 

आणिक दुसरें मज नाहीं आतां
नेमिलें या चित्तापासुनियां ॥१॥

पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनीं
जागृतीं स्वप्‍नीं पांडुरंग ॥२॥

पडिलें वळण इंद्रियां सकळां
भाव तो निराळा नाहीं दुजा ॥३॥

तुका ह्मणे नेत्रीं केलीं ओळखण
साजिरें तें ध्यान विटेवरी ॥४॥

टाळी वाजवावी गुढी उभारावी

 टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥

पंढरीची हाट कऊलांची पेठ । मिळाले चतुष्‍ट वारकरी ॥२॥

पताकांचे भार मिळाले अपार । होतो जयजयकार भीमातिरीं ॥३॥

हरिनाम गर्जतां भय नाहीं चित्ता । ऐसे बोले गीता भागवत ॥४॥

खट नट यावें शुद्ध होउनी जावें । दवंडी पिटी भावें चोखामेळा ॥५॥

रूप पाहाता लोचनी अभंग

  रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥ बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥ सर्व सुखाचे...